Source: shutterstock.com टीप: ज्या शब्दांच रंग बदलला त्यात माहितीच्या लिंक आहेत त्या वर क्लिक करून पाहू शकता! ज्या महाराष्ट्र राज्यातून स्त्रीमुक्तीच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली त्याच राज्यात भर दिवसा दोन महिलांना जिवंत जाळण्यात आले आणि त्यात त्या दोघींचाही मृत्यू झाला , आणि मागील 10 दिवसात 5 मुलींवर तेजाब(Acid Attack) फेकण्याचा घटना घडल्यात. नाही का ह्या लाजिरवण्या घटना ? जेंव्हा जेंव्हा स्त्रिया स्वबळावर समाजानी लादलेल्या अनिष्ट रूढी जश्या की, फक्त चुल आणि मूल ह्या पल्याड जाऊच नये, स्त्रीने शिकून काय करणार ? अश्या परंपरा मोडीत काडून वर येऊ पाहत आहेत, तेंव्हा तेंव्हा असले विकृत-पुरुषी मानसिकता असणारे पुरुष त्यांच्यावर शारीरिक व मानसिक आघात करतात व त्यांची प्रगती थांबवण्यासाठी आतोणात प्रयत्न करतात. स्त्री समानतेच्या गोष्टी जे बोलताना दिसतात, त्यांच्या स्वतःच्या घरातील स्त्रीला रात्री ७ नंतर घराबाहेर जाण्यास तंबी देतात व घरी येण्यास उशीर झाला तर खडेबोल सूनवतात (कदाचित हया समाजातील ज्या वाईट गोष्टी घडत आहेत त्...
नुकत्याच काल पार पडलेल्या सवित्रीआईच्या जयंतीचे (इंग्रजी वर्षयातील पहिला मराठी सण) social मीडिया वरचे स्टेटस पाहून मी विचारात पडलो होतो खरच आज एवढी सावित्रीबाईच्या कामांची महत्त्व एवढं असून सुद्धा आज ही स्त्री ही समाजाची कटपुटली बनुनच आहे, हां काही रणरागिणी ह्या सुसाट समोर गेल्यात पण त्यांनी सावित्रीची विचार आणि काम हे पुढे नेण्याचे विसरून गेल्या वाटलं।
माझा एका मैत्रिणीने मला काल रात्री एक सुंदर लेख सावित्रीबाई वर लिहिला, मी सावित्रीबाई म्हणायपेक्षा सवित्रीआई म्हणू इच्छितो करण तीच कार्यच एवढं मोठं आणि व्यापक. चला पाहुयात कविताने लिहिलेला हा लेख.(कविता ही स्री मुक्ती साठी लढा देणारी जेष्ठ कार्यकर्त्या आहेत)
सावित्री....
जिच्यामुळे माझ्यासारख्या स्त्रियां आज सन्मानाने मिरवत आहेत ... "मी सावित्रीची लेक" म्हणताना स्वतःला अभिमान वाटतो ...पण तेवढ्याच प्रमाणात स्वःताला कुठेतरी गिल्ट फिल होत .कारणं 'सावू' च कार्य आजही पाहिजे त्या प्रमाणात मला पुढे घेवून जाता आलं नाही .सावित्री म्हणजे प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आहे आणि तिच्यामुळे आज कित्तेक सावित्री समाजात अभिमानाने वावरत आहेत.
पुर्वी समाजात स्त्रियांना शिक्षणाचा आधिकार नव्हता...महिलांना कुठलंच स्वतंत्र्य नव्हत ...अशा कठिण परिस्थितीत बालविवाह झालेली सावित्री आपल्या पती सोबत उभी राहते स्वता शिकते आणि पुढे ती समाजातल्या इतर मुलींना शिक्षित करण्यासाठी शिक्षणाचे बीज पेरते ...प्रसंगी त्या पती पत्नीला गावाने बहिष्कार घातला होता..., सावित्री समाजाच्या अशा विरुध्द जावुन मुलींना शिक्षित करते त्यामुळे समाजाने शिक्षणाचे कार्य पुढे जावुच नये म्हणुन लोकांनी खुप वेळा प्रयत्न केला .सावित्री शिकवायला जात असताना तिच्यावर दगड - धोंडे मारले...शेणाचा मारा केला...नानाप्रकारे अपमान केला अशा परीस्थितीत एखादी बाई माघार घेवू शकली असती .पण ती सावित्री अशी नव्हती...ती तर अजुन पेटली...सोबत फातिमा शेख सारखी मैत्रीण आणि जोतिबा सारखा जोडीदार सावित्रीची ताकद बळकट करणारे ठरले...त्यांना घेवून तीचा संघर्ष चालूच राहिला आणि कदाचीत तीच स्त्री-स्वतंत्र्यची नांदी होती...आज महिलांना संविधानात जे स्वतंत्र्य आणि शिक्षणाचा आधिकार मिळाला आहे त्या स्वतंत्र्य आणि शिक्षणासाठी जोतिबा आणि सावित्रीने लढा दिलाय हें विसरून चालणार नाही ...
आज कितीतरी मुलींना सावित्री कळालीच नाही याच फार वाईट वाटतं मला. इतक्या शिकुन जेंव्हा मुली काही न करता घरांत बसतात, स्वताचे निर्णय घ्यायलाही अजुन सक्षम नसतात, छोट्या छोट्या गोष्टींना त्यां हतबल झाल्या की मला त्यांच फार वाईट वाटतं ...कारणं त्यांना मुक्त करणारी, क्रांती ची उब देणारी सावित्री जर समजली असती तर कदाचीत आज त्यांनाही स्वताच्या आयुष्याशी संघर्ष करायला ऊर्जा मिळाली असती .
वटपौर्णिमेला जेंव्हा मुली "हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा" म्हणुन सत्यवानाच्या सावित्रीची आठवण काढतात तेंव्हा मन खिन्न होत ...आतुन तो प्रश्न मला अस्वस्थ करतो ..."यांना ज्योतीबाची सावित्री कधी कळणार ....? "जेव्हा उच्चशिक्षित महिला, मुली महालक्ष्मीचे व्रत नित्यंनियमित पणे करतात आणि तीची पोथी वाचतात त्यां वेळचा त्यांच्यातला उत्साह हा सावित्री च्या जन्मदिनादिवशी का नाही दिसत ...? ज्या सावित्रीच आपण देण लागतो त्यां सावित्रीला कधीतरी वंदन करावंसं वाटेल का ...? त्यां सावित्रीचे विचार, तीची प्रेरणा, जिद्द, संघर्ष कधी वाचता येईल का ...? हा प्रश्न सतत पडत असतो ... जेंव्हा खरी सावित्री जगासमोर येईल, सावित्री समजुन घेता येईल तेव्हाच प्रत्येक स्त्री ही एका नविन क्रांतीच्या प्रकाशवाटा त निर्भयपणे आणि आत्मसन्माने तुडवत जाताना दिसेल.
लेखिका :- कविता अनुराधा
फारच सुंदर
ReplyDeleteThank you swati!
Delete