Source: shutterstock.com टीप: ज्या शब्दांच रंग बदलला त्यात माहितीच्या लिंक आहेत त्या वर क्लिक करून पाहू शकता! ज्या महाराष्ट्र राज्यातून स्त्रीमुक्तीच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली त्याच राज्यात भर दिवसा दोन महिलांना जिवंत जाळण्यात आले आणि त्यात त्या दोघींचाही मृत्यू झाला , आणि मागील 10 दिवसात 5 मुलींवर तेजाब(Acid Attack) फेकण्याचा घटना घडल्यात. नाही का ह्या लाजिरवण्या घटना ? जेंव्हा जेंव्हा स्त्रिया स्वबळावर समाजानी लादलेल्या अनिष्ट रूढी जश्या की, फक्त चुल आणि मूल ह्या पल्याड जाऊच नये, स्त्रीने शिकून काय करणार ? अश्या परंपरा मोडीत काडून वर येऊ पाहत आहेत, तेंव्हा तेंव्हा असले विकृत-पुरुषी मानसिकता असणारे पुरुष त्यांच्यावर शारीरिक व मानसिक आघात करतात व त्यांची प्रगती थांबवण्यासाठी आतोणात प्रयत्न करतात. स्त्री समानतेच्या गोष्टी जे बोलताना दिसतात, त्यांच्या स्वतःच्या घरातील स्त्रीला रात्री ७ नंतर घराबाहेर जाण्यास तंबी देतात व घरी येण्यास उशीर झाला तर खडेबोल सूनवतात (कदाचित हया समाजातील ज्या वाईट गोष्टी घडत आहेत त्...
नुकत्याच काल पार पडलेल्या सवित्रीआईच्या जयंतीचे (इंग्रजी वर्षयातील पहिला मराठी सण) social मीडिया वरचे स्टेटस पाहून मी विचारात पडलो होतो खरच आज एवढी सावित्रीबाईच्या कामांची महत्त्व एवढं असून सुद्धा आज ही स्त्री ही समाजाची कटपुटली बनुनच आहे, हां काही रणरागिणी ह्या सुसाट समोर गेल्यात पण त्यांनी सावित्रीची विचार आणि काम हे पुढे नेण्याचे विसरून गेल्या वाटलं। माझा एका मैत्रिणीने मला काल रात्री एक सुंदर लेख सावित्रीबाई वर लिहिला, मी सावित्रीबाई म्हणायपेक्षा सवित्रीआई म्हणू इच्छितो करण तीच कार्यच एवढं मोठं आणि व्यापक. चला पाहुयात कविताने लिहिलेला हा लेख.(कविता ही स्री मुक्ती साठी लढा देणारी जेष्ठ कार्यकर्त्या आहेत) सावित्री.... जिच्यामुळे माझ्यासारख्या स्त्रियां आज सन्मानाने मिरवत आहेत ... "मी सावित्रीची लेक" म्हणताना स्वतःला अभिमान वाटतो ...पण तेवढ्याच प्रमाणात स्वःताला कुठेतरी गिल्ट फिल होत .कारणं 'सावू' च कार्य आजही पाहिजे त्या प्रमाणात मला पुढे घेवून जाता आलं नाही .सावित्री म्हणजे प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आहे आणि तिच...